200 कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

200 कोटींच्या मनी लाँडरिंगप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जॅकलिन हिला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून आज आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री नोरा फतेहीची पाच तास कसून चौकशी केली. नोरा सोबत पिंकी ईराणी हिला देखील चौकशी साठी बोलावण्यात आले होते.

सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीला पॉल 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीच्या ताब्यात आहेत. याव्यतिरिक्त आणखीन 6 जणांना ईडीने याप्रकरणी अटक केली आहे.  सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंध असल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची चौकशी केली होती. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए), 2002 अंतर्गत नोंदवलेल्या खटल्यात एप्रिलच्या अखेरीस ईडीने फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली.