कौशल इनामदारांच्या पोस्टवर प्रशांत दामले म्हणाले ‘चला बॅग आवरायला घेतो आता…’

गुगल, याहू अशी सर्च इंजन हे सध्याचे पथर्शक, मार्गदर्शक बनले आहेत. कशाचीही माहिती हवी असल्यास माणूस हमखास सर्च इंजिनचा मार्ग स्वीकारतो. अर्थातच झटपट माहिती मिळवण्याचा हा सोपा आणि सहज मार्ग आहे. मात्र काही वेळा सर्च इंजिनवरून समोर झळकाऱ्या माहितीच्या लिंकवर दिशाभूल करणारी किंवा कुणी काहीतरी चुकीची माहिती टाकली असल्यास तशीच माहिती समोरच्या व्यक्तीला मिळते. भाषांतर तर अनेकदा चुकलेली, भरकटलेली असतात. तेव्हा तशीच माहिती अपलोड केली असल्यास शोधणाऱ्याची मात्र मोठी गफलत होते. हेच घडलं आहे संगीतकार कौशल इनामदार यांच्या बाबतीत. आणि त्यावरून मजा घेतली आहे की मराठीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी.

kaushal-s-inamdar

झालं असं की, इंटरनेटवर कौशल इनामदार यांच्या नावासंदर्भात सर्च करताना, ‘कौशल इनामदार एक भारतीय फिल्म अभिनेता हैं, जोकि मुख्य तौर से हिंदी सिनेमा में सक्रिय हैं। कौशल की हालिया रिलीज फिल्म इट्स ब्रेकिंग न्यूज़ है।’, अशी माहिती झळकली. अस्मिता सुधीर पांडे यांनी कौशल इनामदार यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ही hindi.filmibeat.com ने केलेली चूक मिश्कील शब्दात फेसबुकवर मांडली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रामुख्याने मी हिंदी चित्रपटातला अभिनेता आहे हे मला आजच कळलं. धन्यवाद Asmita Sudheer Pande हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल. आता रोज एकदा ही साइट अपडेट करून पाहणार म्हणजे आयुष्यात माझं काय चाललंय हे वेळोवेळी कळत राहील.’

त्यांच्या या पोस्टवर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या मिश्कील स्वभावाला साजेशी एक कमेंट टाकली आणि मग त्यावर चर्चाच चर्चा रंगली. कौशल इनामदार यांच्या पोस्टवर प्रशांत दामले यांनी पोस्ट लिहिली की, ‘चला माझी बॅग आवरायला घेतो आता’. त्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडला. खुद्द कौशल इनामदारी म्हणाले, ‘हे पातक नको प्रशांत दादा’.

kaushal-s-inamdar-post

अनेकदा अनेक वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी चुकीची भाषांतरीत माहिती पोस्ट करतात आणि त्यामुळे असा गोंधळ उडतो.

2007 मध्ये ‘It’s Breaking News’ हा चित्रपट विशाल इनामदार यांनी दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटाला कौशल इनामदार यांनी संगीत दिलं होतं. मात्र हिंदी संकेतस्थळाने कौशल इनामदार हे त्यात अभिनेते असल्याचे म्हटलं आहे. तसेच ते प्रामुख्याने हिंदी चित्रपट अभिनेते असल्याचे म्हटल्यानं हा गोंधळ उडाला.

आपली प्रतिक्रिया द्या