शुभमंगल सावधान! अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरविवाहबद्ध

मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री अभिज्ञा भावे, मानसी नाईक, आशुतोष कुलकर्णी यांच्यानंतर आता अजून एक जोडी लग्नबंधनात अडकली आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे रविवार 24 जानेवारी रोजी धुमधडाक्यात विवाहबद्ध झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून या लग्नाची चर्चा सुरू होती.

या लग्नापूर्वी अनेक कलाकारांनी त्यांना केळवणाची निमंत्रणं दिली होती. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. अखेर हा बहुप्रतिक्षित सोहळा कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला आहे. या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या