
जगभरातील चित्रपटांसाठी कान्स चित्रपट महोत्सव म्हणजे एक पर्वणीच. या चित्रपट महोत्सवात उद्या म्हणजेच 15 मे 2025 रोजी एका मराठी चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. स्नो फ्लॉवर असे या चित्रपटाचे नाव असून त्यात अभिनेत्री छाया कदम यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी या बाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
छाया कदम या कान्स चित्रपट महोत्सवाला पोहोचल्या आहेत. तिथून त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ”गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये “All we imagine as light” आणि “Sister Midnight” हे दोन सिनेमे घेऊन आले होते. अगदी त्याच आनंदात आणि उत्साहात यावर्षी “Snow Flower” हा मराठी सिनेमा घेऊन कान्स मध्ये दाखल झाले आहे. उद्या त्याचे स्क्रिनिंग आहे. इथे राहणाऱ्या किंवा फेस्टीव्हल साठी आलेल्या ज्यांना कोणालाही शक्य असेल त्यांनी नक्कीच या. भेटूया उद्या आपल्या snow flower सोबत.” अशी पोस्ट छाया कदम यांनी शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.