चेहऱ्यावर स्कार्फ बांधून जुई पोहोचली बाजारात

अभिनेत्री जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारतेय. शूटिंगच्या व्यस्त शेडय़ूलमधूनदेखील वेळात वेळ काढून ती घरच्या जबाबदाऱया पार पाडताना दिसतेय. नुकताच जुईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कर्जतमधील शुक्रवारच्या आठवडी बाजारात ती चक्क दुचाकीवरून भाजी खरेदी करण्यासाठी गेल्याचे दिसतेय. आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून तिने चेहऱयावर स्कार्फ बांधला होता. व्हिडीओ शेअर करत जुई म्हणाली, ‘‘जे लोक मला ओळखतात त्यांनाच माहीत आहे की, भाजी खरेदी करणे मला किती आवडते. मी कुठेही जाऊन ताजी भाजी खरेदी करू शकते. सकाळी उठून शुक्रवारच्या बाजारामधून ताजी भाजी खरेदी करणे हा एक वेगळा आनंद आहे. ही रील बघितल्यानंतर कर्जतमधील उत्साह तुम्हालाही जाणवेल.’’ जुईचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.