मलायका अरोराने केली कोरोनावर मात, पालिकेचे मानले आभार

malaik-aarora

बॉलिवूड अभिनेत्री मलायक अरोरा हिने कोरोनावर मात केली आहे. तिनेच आज एक फोटो शेयर करत इंस्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. तसेच वारंवार मार्गदर्शन करणारे पालिका कर्मचारी, सल्ला देणारे डॉक्टर आणि आधार देणारे कुटुंबीय यांचेही तिने आभार मानले आहेत.


रविवारी मलायकाने चेहऱयावर मास्क आणि हातात कॉफीचा कप घेऊन फोटो शेयर केला आहे. त्यासोबत तिने गेल्या 15 दिवसांतील आपले अनुभव सांगितले आहेत. मलायका म्हणाली, अखेर कित्येक दिवसांनी मी माझ्या खोलीमधून बाहेर आले आहे. हे म्हणजे स्वतःमध्येच एक प्रवास केल्यासारखे आहे. कमीत कमी वेदना आणि समस्यांसह मी कोरोनावर मात केली आहे.’ 6 सप्टेंबरला मलायका हिला कोरोनाची लागण झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या