करंट! वीज बिलाचा आकडा पाहून रेणुकाही संतप्त

507

अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियाद्वारे वीजबिल तब्बल 36 हजार रुपये आल्याने काल संताप व्यक्त केला. त्यानंतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यादेखील वीज बिलाचा आकडा बघून संतप्त झाल्या आहेत. तसेच त्यांनी अचानक बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्नदेखील विचारला आहे.

रेणुकाने ट्विट करत माहिती दिलीय की, मे महिन्यात माझे लाईट बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याचे 29 हजार 700 रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18,080 रुपये दाखवले आहे. पण माझे बिल 5510 रुपयांवरून 18080 रुपये कसे झाले, असा सवाल तिने केला आहे.

रेणुकाच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला याविरोधात आवाज उठवण्याचा तर काहींनी उपोषणावर बसण्याचा सल्ला दिला आहे. वीज बिलाचे आकडे पाहून सामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सगळे शॉक झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या