ऋतुजा बागवेला एकाच वर्षी 12 पुरस्कार

35


सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर घेत आपले आयुष्य बदलू पाहणारी ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अप्रतिम साकारली. यामुळे ऋतुजाला गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ 12 पुरस्कार मिळाले. यात राज्य शासनाचा पुरस्कार, ‘मटा सन्मान’, ‘पं. दीनानाथ मंगेशकर’, ‘मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार, ‘रंगप्रतिभा’, ‘एकता’, ‘संस्कृती कलादर्पण’, ‘साहित्य संघ’, ‘मुंबई गौरव’, ‘महाराष्ट्रीय ऑफ द इयर’ वगैरे पुरस्कारांचाही समावेश आहे. तिच्या या पराक्रमाची माहिती तिच्या आईने रेकॉर्डसाठी पाठवली. ती माहिती खरोखर आश्चर्य वाटण्यासारखी होती याची कल्पना रेकॉर्डवाल्यांनाही आली आणि तिच्या नावाची ‘मोस्ट ऍवॉर्डस् फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर’ या अंतर्गत नोंद करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या