…अन् रस्त्यावर नाचणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिले पैसे!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या वेगवेगळ्या अदांमधील फोटो शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करण्याची संधी सोडत नाही. तसेच बऱ्याचदा लहानपणीचे फोटो शेअर करते आणि त्यासोबत घडलेल्या काही खास क्षणांचा उल्लेखही सारा आपल्या पोस्टमध्ये करते. असाच एक भन्नाट किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला.

रस्त्यावर नाचताना पाहून लोकांनी सारा अली खान हिला चक्क भिकारी समजले. एवढेच नाही तर काहींनी तिला भीक म्हणून पैसेही दिले. ‘झूम’ टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत तिने हा किस्सा सांगितला आहे.

सुट्टीमध्ये कुटुंबासोबत बाहेर गेली असताना शॉपिंगची लहर आली. शॉपिंगसाठी बाहेर गेल्यावर आई अमृता, वडील सैफ अली खान आणि भाऊ इब्राहिम हे एका दुकानात खरेदी करण्यासाठी गेले. मात्र सारा वेगळ्याच धूनमध्ये होती आणि रस्त्यावर नाचत होती. छोट्याशा साराला रस्त्यावर नाचताना पाहून लोकांनी तिला भिकारी समजले आणि पैसेही दिले.

सैफ अली खान आणि अमृता दुकानातून खरेदी करून बाहेर आले तेव्हा सारा रस्त्यावर नाचत होती आणि लोकही तिचा नाच पाहून तिला पैसे देत होते. त्यावेळी सारा क्युट नाही तर रस्त्यावरील भिकारीण वाटत होती. त्यामुळे लोक तिला पैसे देत होते, असे अमृता सिंग यांनी सांगितले.

आगामी चित्रपट

दरम्यान, सारा अली खान अभिनेता वरून धवनसोबत ‘कुली नंबर 1’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती आनंद एल रॉय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटातही दिसेल. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुष सोबत मोठा पडदा शेअर करेल.

आपली प्रतिक्रिया द्या