अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो केले शेअर

अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी एका खासगी सोहळ्यात गुपचूप त्यांचा साखरपुडा उरकला आहे. शिवानीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. “अखेर बंधनात” असं कॅप्शन लिहित अभिनेत्री शिवानी सुर्वेने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

साखरपुड्यासाठी शिवानीने लॅव्हेंडर रंगाची सुंदर साडी नेसली आहे तर अजिंक्यने नेहरू जॅकेट व कुर्ता असा पेहराव केला आहे. शिवानीने अगदी साधा लूक केलेला असला तरी ती त्यात फारच सुंदर दिसत आहे. साखरपुड्यासाठी शिवानीचा लूक जरी सिंपल सोबत असला तरी तिच्या हातातील हातभर हिरवा चूडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवानी व अजिंक्य हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या साखरपुड्याच्या पोस्टवर चित्रपटसृष्टीतूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवानीच्या पोस्टवर कलाकार मंडळींंसह चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. स्वप्नील जोशी, अनघा अतुल, सुयश टिळक, सानिया चौधरी, ऋतुजा बागवे, पर्ण पेठे, मानसी नाईक, सुव्रत जोशी अशा अनेक कलाकार मंडळींनी शिवानी व अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत.