विजेचे भरमसाठ बिल पाहून अभिनेत्रीला ‘शॉक’, फोटो शेअर करत व्यक्त केला संताप

बॉलिवूड कलाकारांना शाही जीवन जगण्याची सवय असते. मात्र याला अभिनेत्री तापसी पन्नू अपवाद आहे. तापसी हिने भरमसाठ बिलाची तक्रार केली असून याचा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

वाढीव बिल पाहून तापसी हिला धक्का बसला. सोशल मीडियावर ट्विट करून तिने आपला संताप व्यक्त केला. लॉकडाऊनला तीन महिने झाले असून या काळात मी असे कोणते उपकरण वापरले ज्यामुळे एवढे भरमसाठ बिल आले याचा मी सध्या विचार करत आह, अशी पोस्ट तिने ट्विटरवर शेअर केली. यासोबत तिने बिलाचा आकडाही टाकला असून तो जवळपास 36 हजार दिसत आहे.

तापसी हिने आपल्या ट्विटमध्ये अदानी इलेक्ट्रिसीटीला टॅग केले आहे. तापसी रहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणालाही एवढे बिल आले नाही. विशेष म्हणजे या अपार्टमेंटमधील घरी फक्त आठवड्यातील एक दिवस साफसफाईसाठी जाते, असे तिचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या