कोंकणी सिनेमात झळकणार अभिनेत्री वर्षा उसगावकर

नव्वदीच्या दशकात मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱया अभिनेत्री वर्षा उसगावकर आपल्या प्रत्येक कामाचा मनापासून आनंद घेतात. आपल्या अष्टपैलू, मेहनती आणि यशस्वी वाटचालीत त्यांनी मराठी व हिंदीबरोबरच बंगाली, राजस्थानी, भोजपुरी, तेलुगू, छत्तीसगढी भाषेतील चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. आता त्या आपल्या मातृभाषेत म्हणजेच कोंकणी चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्या ‘संज वेलार वरेन’ या कोंकणी चित्रपटाचे शूटिंग सध्या गोव्यात सुरू आहे. कोंकणी चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांना विशेष आनंद झाला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी ‘जांवय नंबर वन’, ‘बॅन्डकार’ या कोंकणी चित्रपटांत काम केले आहे. या चित्रपटांच्या गोव्यातील पणजी या ठिकाणी झालेल्या विशेष खेळांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.