`अडाणी’च्या कारभारात सुधारणा, हप्त्याने वीज बिल भरणाऱ्या उपनगरातील ग्राहकांची व्याजातून सुटका

उपनगरात वीज पुरवठा करणाNया अदानी इलेक्ट्रिसिटीने आपल्या ‘अडाणी’ कारभारात सुधारणा केली आहे. याआधी जून महिन्याचे वीज बिल तीन समान हप्त्याने भरण्याची सवलत अदानीने दिली होती. मात्र त्यावर ९ टक्के व्याजाची आकारणी करण्यात येणार होती. त्यामुळे ग्राहकांना व्याजाचा भुर्दंड बसणार असल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध होताच कंपनीने त्याची दखल घेत आज आपल्या निर्णयात सुधारणा केली असून हप्त्याने बिल भरणाNया ग्राहकांना व्याज माफ केले आहे.

अदानीचे उपनगरात २१ लाख घरगुती ग्राहक आहेत. जूनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त करताच अदानी इलेक्ट्रिसिटीने त्याची दखल घेत तक्रारी निवारणाचे मोहीम सुरू केली आहे. तसेच वीज आयोगाच्या निर्देशानुसार जून महिन्याचे बिल हप्त्याने बिल भरण्याची सवलत दिली होती. मात्र त्यावर आयोगाने निश्चित केल्याप्रणाने ९ टक्के व्याज आकारले जाणार होते. त्यामध्ये सुधारणा करत मुदतीआधी बिलाचा हप्ता भरणाNया ग्राहकांना व्याजात सवलत देण्याचा निर्णय अदानी इलेक्ट्रिसिटीने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या