नवल बजाज नवे एटीएस प्रमुख

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी आज अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली. बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची पेंद्रात प्रतिनियुक्तीवर एनआयए प्रमुखपदी  बदली  झाल्यापासून राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख पद रिक्त होते. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांच्याकडे एटीएसचे प्रमुखपद सोपविण्यात आले. बजाज यांनी मुंबईसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी केली आहे.