‘फॉरवर्ड सिमेन्स युनियन’ची आज राष्ट्रीय परिषद, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

1153

देशातील नाविक बांधवांच्या लाल बावटाप्रणीत ‘फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया’ने उद्या, 25 ऑगस्टला दुपारी 2 वाजता भव्य राष्ट्रीय नाविक परिषदेचे आयोजन केले आहे. चर्चगेट येथील के. सी. कॉलेजमध्ये ही परिषद होणार असून या परिषदेला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नरेश बिरवाडकर यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. संघटनेची वार्षिक सभादेखील याच दिवशी होणार आहे. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून सर्व नाविक बंधूंनी या परिषदेला मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या