वकिलांना सध्या तरी रेल्वेतून प्रवास करता येणार नाही! राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

549
bombay-high-court-1

कोविडची परिस्थिती पाहता सध्या तरी वकिलांना लोकल मधून प्रवास करण्याची मुभा देता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र त्यांनी कोर्टात सादर केले. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱया कर्मचाऱयांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वकिलांचाही अत्यावश्यक सेवा देणाऱयांमध्ये समावेश करावा व त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी हायकोर्टात वकिलांमार्फत विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकेसंदर्भात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर माहिती देताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की वकिलांनी या संदर्भात आराखडा सादर केला मात्र शासनाने तो फेटाळून लावला. कोविडची परिस्थिती पाहता सध्या तरी ते शक्य नाही ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या