मुंबई-ठाण्यात सरकार उभारणार परवडणारी घरे – जितेंद्र आव्हाड

561
ncp leader jitendra awhad

सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्यावतीने मुंबई व ठाण्यात परवडणारी घरे उभारण्यात येतील अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याची म्हाडाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री दररोज पक्ष कार्यालयात लोकांना भेटतात. या जनता दरबाराच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळीच्या टागोर नगर व कन्नमवार नगरमध्ये मोठ्या वसाहती बांधण्याची म्हाडाची योजना आहे. मुंबईच्या उपनगरातील मोकळे भूखंड म्हाडा ताब्यात घेईल. त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत काही भूखंड मोकळे आहेत. त्या संदर्भात काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. वाद असलेल्या अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर परवडणारी घरे बांधता येतील. त्यातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्य़ा किंमतीत घरे उपलब्ध होतील. म्हाडाने कन्नमवार नगर, गांधीनगर, मोतीलाल नगर अशा 56 वसाहती उभ्या केल्या होत्या याची आठवण त्यांनी यानिमित्ताने करून दिली.

पातळी सोडून बोलू नये

रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी नावाने नावाने केला. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी नावाने उल्लेख करणे हे माझ्यासारख्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्य़ांना कधीही आवडणार नाही. टोकाचे मतभेद असू शकतात पण  म्हणून कोणीही कोणाबद्दल पातळी सोडून बोलू नये असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या