रुफटॉप सोलरची उभारणी आता हौसिंग सोसायट्यांच्या आवाक्यात!

1749

आतापर्यंत हौसिंग सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी रुफ टॉप सोलरची उभारणी आता आवाक्यात आली आहे. हौसिंग सोसायट्यांना आपल्या इमारतीच्या छतावर सहजपणे रुफ टॉप सोलर प्रकल्प उभारता यावा म्हणून केंद्रीय अपारंपारिक ऊर्जा विभागाने प्रकल्प उभारणीच्या खर्चात 13 टक्क्यांपासून 24 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे हौसिंग सोसायट्यांच्या इमारतीवरील सौर प्रकल्पातून चालना मिळणार आहे.

कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांवरील अवलंबित्व कमी करून अपारंपारिक ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा निर्मिती वाढवण्यावर अपारंपारिक ऊर्जा विभागाने भर दिला आहे. त्यानुसार ग्रीडला जोडल्या जाणाऱ्या इमारतीच्या छतावर सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात उभारल्या जाणाऱ्या एक हजार किलोवॅटपर्यंत क्षमता असलेल्या प्रकल्पाचा उभारणी खर्च निश्चित केला होता. त्यानुसार एक किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 54 हजार रुपये एवढा खर्च येतो. त्यामुळे एखाद्या सोसायटीला दहा किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारावयाचा असेल तर साडे पाच लाख रुपयांपर्यंत खर्च जातो. हा खर्च आवाक्याबाहेर असल्याने सोसायट्यांकडून रुफ टॉप सोलरला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्याची दखल घेत अपारंपारिक ऊर्जा विभागाने प्रकल्प उभारणी खर्चात मोठी कपात केली आहे. त्यामुळे दहा किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प 40-42 हजार रुपयात होणार असल्याने रुफ टॉप सोलरला चालना मिळणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या