
अझमतुल्लाह ओमरझाईने अष्टपैलू कामगिरी करत अफगाणिस्तानला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवून दिला. यूएईने 160 धावांचे आव्हान उभे केले होते आणि शेवटच्या पाच षटकांत 52 धावांची गरज असताना ओमरझाईने उपयुक्त फलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ओमरझाईने 15 धावांत 4 बळी घेत यूएईला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. नंतर 21 चेंडूंत नाबाद 40 धावांची तुफानी खेळी करत त्याने सामना अफगाणिस्तानच्या बाजूने झुकवला. अखेरच्या षटकात 6, 4, 4 अशी फटकेबाजी करत ओमरझाईने अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. दरविश रसूलीने 43 धावांची साथ दिली. तत्पूर्वी यूएईने 9 बाद 160 अशी धावसंख्या उभारली. ओमरझाईने आर्यांश श् ार्माला स्विंगवर बाद केले. मात्र, शराफू (40) आणि सोहैब खान (68) यांनी 84 धावांची भागीदारी करत यूएईला सावरले.



























































