अफगाणिस्तानात पुन्हा सुरू होणार क्रूर शिक्षा? तालिबानींच्या मते फासावर लटकवणे गरजेचे

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यापासून तेथील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानचे कादे लागू होत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेक गोष्टींवर देशात बंदी घातली आहे. महिलांवरीस बंधनं कडक केली आहेत. आता कदाचित तालिबान पुन्हा एकदा क्रूर शिक्षा पद्धती देखील सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे अफगाणिस्तानात आता पुन्हा एकदा भर रस्त्यात आरोपींना फासावर लटकवले जाऊ शकते.

तालिबानचे नेते मुल्ला नुरुद्दीन तुराबी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत फासावर लटकवणे, हात छाटणे अशा शिक्षा गरजेच्या असल्याचे म्हटले आहे. ” प्रत्येकजण आमच्या जाहीर शिक्षांबाबत टीका करत असतो आम्ही कधीच त्यावर प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र आमच्या सरकारचे कायदे नियम काय असावे हे आमचे आम्हीच ठरवणार. आम्ही इस्लाम व कुराणनुसारच सर्व काही करत असतो. सुरक्षेसाठी कडक शिक्षा देणे गरजेचे आहे. त्यामुळे हात छाटणे, फासावर लटकवणे अशा शिक्षा गरजेच्या आहेत”, असे तुराबी यांनी या मुलाखतीत सांगितले.

तालिबान्यांचा उन्माद; हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून केले उड्डाण

अमेरिकेने देश सोडताच तालिबान्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाले असून, उन्माद सुरू केला आहे. तालिबान्यांनी हातात बंदुका घेऊन काबूल विमानतळाचा ताबा घेतलेला. हवेत गोळीबार करीत आनंद साजरा केला. काही दिवसांपूर्वी कंदहारमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर त्यांची काही हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने अफगाणमध्येच आहेत. तालिबान्यांनी ब्लॅक होक हेलिकॉप्टरला मृतदेह दोरीने बांधून तो कंदहार शहरावरून फिरवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दहशत वाढली आहे. त्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह हेलिकॉप्टला बांधला.

आपली प्रतिक्रिया द्या