अफगाणमध्ये अनैतिक संबंधास कठोर शिक्षा

कोणत्याही महिलेने नवऱ्याशिवाय अन्य पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवल्यास तिला दगडाने ठेचून ठार मारले जाईल, अशा कठोर शिक्षेचे फर्मान अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने जारी केले आहे. एका ऑडिओ संदेशात अखुंदजादाने पाश्चात्य देशांच्या लोकशाहीला आव्हान दिले आणि इस्लामिक कायदा शरियाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. दोषी महिलांना सर्वांसमोर सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके व दगडफेक करण्यात येईल.