1993 च्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी 25 वर्षांनंतर जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

1993 मधील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जगदीश उर्फ माधव प्रभाकर सूर्यवंशी (55) रा. नणंद ता. औसा जि. लातूर याला 25 वर्षांनंतर किल्लारी पोलिसांनी अटक केली.

1993 पासून तो 25 वर्ष फरार होता. आरोपी गावी आला आहे व तो त्याच्या शेतात काम करीत आहे, अशी माहिती मिळताच किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण,व पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत चपटे यांना नणंद गावी पाठविले व आरोपी तोच आहे अशी खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

नुतन पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्लारी पोलिसांनी आता पर्यंत एकूण तीन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती किल्लारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी दिली.