
अमेरिकी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेला जाणार्या विमानांमध्ये टपाल वाहतूक करण्यासाठी विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. हिंदुस्थाननंतर आता युरोपीय देशांनीही अमेरिकेची टपालसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकी प्रशासनाने हिंदुस्थानी उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे सध्या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने टपालसेवा स्थगित केली. ३० जुलै रोजी अमेरिकेच्या प्रशासनाने नवे कार्यकारी आदेश काढले. त्यानुसार १०० डॉलरहून अधिक किमतीच्या वस्तूंवर २९ ऑगस्टपासून अमेरिकेत सीमा शुल्क आकारले जाणार आहे. ८०० डॉलरपर्यंतच्या वस्तूंवरील सीमा शुल्क सवलत रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, हिंदुस्थान सरकारच्या केंद्रीय दळणवळण विभागाने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा २५ ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केली आहे. परंतु, १०० डॉलरपर्यंतची पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तूंसाठी ही सेवा सुरू राहणार आहे.
या देशांचा अमेरिकेला दणका
ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, इटली या देशांनी अमेरिकेची टपालसेवा रोखली आहे. इटलीच्या डॉयचे पोस्टने २३ ऑगस्टपासून टपालसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ब्रिटनच्या रॉयल मेल सर्व्हीसनेही अमेरिकेला दणका दिला आहे.