16 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष सुटका

तब्बल 16 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर खूनाच्या प्रकरणातील एका आरोपीची ओडीशा उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. 2003 साली या प्रकरणात तुरुंगात कैद झालेल्या कैद्याने तब्बल 16 वर्षानंतर मोकळा श्वास घेतला आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगत न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.

अनुप्रम यादव असे त्या आरोपीचे नाव असून त्याला 2003 साली एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी ओडीशातील नौपाडा पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर 22 जानेवारी 2004 साली त्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेला यादव याने उच्च न्यायालयात आवाहन केले. मात्र यादवचा खटला सुनावणीसाठी न्यायालयात यायला तब्बल दहा वर्षांचा कालावधी गेला. 13 ऑक्टोबर 2014 ला प्रथमच यादवच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात गेल्या सहा वर्षीत फक्त चार वेळा सुनावणी झाली. चौथ्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने यादव विरोधात कोणताही भक्कम पुरावा नसल्याने तो निर्दोष असल्याचे सांगत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या