कुडाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जय भगवान गोयल यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

633

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित करून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या लेखक जय भगवान गोयल यांचा प्रतिकात्मक पुतळा कुडाळ उद्यमनगर येथे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी लेखक जय भगवान गोयल तसेच केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, तालुकाध्यक्ष भास्कर परब, सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस चंद्रकांत पाताडे, विधानसभा अध्यक्ष सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, अल्प संख्याक सेल तालुकाअध्यक्ष नझीर शेख, महिला तालुका अध्यक्षा पूजा पेडणेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या