
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात केवळ 42 सेकंद नव्हे, तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे. तो अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून सरकार याबाबत खुलासा करेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या पृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वर्गीय अटलजींच्या, तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का, असा खरमरीत सवाल रोहित पवार यांनी केला आहे.