
नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सध्या वेग घेत असून, राज्यात गाजत असलेल्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारात आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. यामुळे, ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अर्बन बँकेतील घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, या प्रकरणात आता ‘ईडी’ने हस्तक्षेप करीत बँकेकडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे मागविली आहेत. 8 जुलै रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ईडी कार्यालयात हजर राहून माहिती सादर केली आहे.
नगर अर्बन बँकेतील हा घोटाळा 2014 ते 2019 या कालावधीत घडला. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत नमूद करण्यात आले होते की, त्या काळातील चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या बैठका घेऊन कर्जप्रकरणे मंजूर केली. या कर्जप्रकरणांमध्ये काही कर्जदारांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, खोटे आर्थिक पत्रके व फसवे दस्तऐवज तयार करण्यात आले. या माध्यमातून बँकेचे आणि ठेवीदारांचे 100 ते 150 कोटींचे नुकसान झाले.
या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. यामध्ये अपहाराची रक्कम 291.25 कोटी असल्याचे स्पष्ट झाले. या गुह्यात आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. प्रदीप पाटील, राजेंद्र लुणिया, मनेष साठे, अनिल कोठारी, अशोक कटारिया, शंकर अंदानी, मनोज फिरोदिया, प्रवीण लहारे, अविनाश वैकर, अमित पंडित, अक्षय लुणावत, राजेंद्र डोळे, डॉ. नीलेश शेळके, केशव काळे, रवींद्र कासार, रवींद्र जेजुरकर, रूपेश भन्साळी या संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्व संशयित आरोपी