नगर – दसरा मेळाव्यासाठी 300 शिवसैनिक मुंबईला पायी रवाना

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातील 300 शिवसैनिक पायी वारीने सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन तसेच विशाल गणपतीचे दर्शन घेऊन नगर शहरातून रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे म्हणाले की, शिवसेना कशी फुटली, कोणी फोडली हे आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. जनतेत भाजपा आणि गद्दार शिंदे सेनेबाबत प्रचंड चीड आहे. भाजपा आणि शिंधे सरकार मध्ये हिंमत असेल तर आज निवडणूका घ्याव्यात, शिवसैनिक त्यांची पळता भुई थोडी करतील. यावेळचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्यती असा होणार असून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. आज निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल. कोणी कितीही अडथळे आणले तरी मुंबईसह अहमदनगर महानगर पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा टक्का वाढणार हे निश्चित आहे असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.

यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, विक्रम राठोड,संभाजी कदम, नगर सेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर,माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती प्रवीण कोकाटे, माजी सभापती संदिप गुंड, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, पाथर्डीचे उद्धव दुसंग, नेवासाचे हरिभाऊ शेळके, सुभाष कानडे, श्रीगोंदाचे बाळासाहेब दूतारे, संतोष खेतमाळीस, राहुरीचे भगवंत मुंगसे, बाळासाहेब मुसमाडे, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, नगर सेवक विजय पठारे, संग्राम कोतकर,नगर सेवक अमोल येवले, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, नगर सेवक दत्ता कावरे, पप्पू भाले, अरुण गोयल, नगर सेवक सचिन शिंदे, उषा ओझा,शिक्षक सेनेचे पारुनाथ ढोकळे, विशाल गायकवाड, शैलेश क्षीरसागर, डॉ. श्रीकांत चेमटे, अभिजित तांबडे, अशोक झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, जिवा लगड,तालुका युवा सेनेचे प्रवीण गोरे, पोपट निमसे, भाऊ बेरड, अजय बोरुडे, अविनाश पवार, गणेश वायभासे, दत्तू हजारे यांसह हजारो शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले होते.