नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

603

नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. दरम्यान एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. गुरुवारी सहा रुग्ण सापडल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. मुकुंदनगर भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगरमध्ये कालपर्यंत 8 बाधित होते. त्यापैकी शहरातील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यास 2 दिवसांपूर्वी घरीही सोडण्यात आले होते. त्यामुळे नगरकरांची धाकधूक काहीशी कमी झाली होती. परंतु नंतर शहरात तसेच जामखेडमध्ये असे एकूण 8 बाधित आढळले आहेत. बुधवारी (दि.1) पुण्याच्या एन.आय.व्ही.कडे 51 नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी (दि.२) दुपारी प्राप्त झाला. त्यापैकी 6 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये 2 परदेशी,2 मुकुंदनगरचे तर 2 संगमनेर येथील नागरिक आहेत. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील आहे. बाधित व्यक्ती 17 ते 68 वर्षे वयोगटातील व्यक्ती असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या