शेतकरी कर्जमाफी – 2 लाख 36 हजार शेतकऱ्यांचे झाले आधार प्रमाणित

700

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या यादीमध्ये आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 2 लाख 36 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आलेले आहे. दुसरीकडे ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांचे निरसन करण्यासाठी समिती गठीत करून अनेक तक्रारी निकाली काढलेल्या आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये कर्जमाफी योजनाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती, यामध्ये दोन लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश होता. यासाठी कोणतेही कागदपत्र घेऊन न जाता फक्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणित करून घ्यायचे आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर ज्या बँकेमध्ये कर्जाचे खाते आहे, त्या बँकेमध्ये तात्काळ पैसे जमा होण्याची प्रक्रिया सध्या केली जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये दोन लाख 36 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आलेले आहे.

साधारणत: 900 हून अधिक जणांच्या तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत, त्याचे सुद्धा निराकरण करून अनेक तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या कर्जाच्या रखमा या तात्काळ संबंधित बँकेमध्ये जमा होण्याची प्रक्रिया त्या दिवसापासून सुरू झालेली आहेत. नगर जिल्हा सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत सुमारे बाराशे कोटी रुपये जमा झालेले आहेत, तर राष्ट्रीयकृत बँकांकडे सुद्धा रक्कमा जमा होऊ लागलेल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये सुट्टीच्या दिवशी सुद्धा आधार प्रमाणित करण्याचे काम सुरू होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीसुद्धा या संदर्भातला आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे. ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचा तात्काळ निपटारा करा असे आदेश दिलेले आहेत. कर्जमाफीचे पैसे तात्काळ जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आल्यामुळे आता तेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वी थकबाकी पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या कर्जमाफी योजनेच्या संदर्भात उर्वरित शेतकऱ्यांची नावांची पडताळणी झाल्यानंतर रक्कम जमा करण्यात येणार आहे.

कर्जमाफीच्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित झाले आहे त्यांचे पैसे लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे आधार प्रमाणित झालेली नाही त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या