नगर जिल्ह्यात किराणा मालाची जादा भावाने विक्री, नागरिकांची सर्रास लूट

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जीवनावश्यक असलेल्या किराणा मालाचा व्यापार्‍यांनी तुटवडा दाखवला आहे. अनेक ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांनी साखर, शेंगदाणे, तेल व डाळींच्या भावात अचानक अव्वाच्या सव्वा वाढ करून सर्वसामान्यांची पिळवणूक चालवली असून याबाबत तक्रार करणाऱ्यांना पटले तर घ्या असा सल्ला दिला जात आहे. पालिका अधिकार्‍या याबाबत तक्रार केली तर ते पोलिसांकडे जा म्हणतात तर पोलीस पालिकेकडे बोट दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

90 रूपयाचा चा शेंगदाणा 120 रुपये किलोने तर 1200 रूपये तेलाचा डबा 1500 रूपयाचे वर विकला जात आहे. डाळींचा दर किलो मागे 10 रूपयाने तर मसाल्याच्या पदार्थांचे दरही वाढविण्यात आले आहे. साबुदाणा, पोहे यातही दरवाढ झाली.  सर्वच ठोक व्यापाऱ्यांनी दर वाढविल्याचे कारण किरकोळ विक्रेते सांगत आहे. मालाचा पुरवठा होत नाही असे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीला परवानगी असतानाही केवळ कृत्रिम टंचाई दाखवत ही भाववाढ करण्यात आली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेला सर्व सामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी किराणा दुकाने 24 तास सुरू ठेवाण्याचा निर्देश सरकारने दिले आहेत.

राहता शहरातील ठोक व किरकोळ किराणा विक्रेत्यांनी अचानक तेल, साखर, डाळी आदींचे दर वाढवून सर्वसामान्य नागरिकांची लुट चालविली आहे. इतर  काही जणांनी भाजीपाला विक्री हे नफा मिळविण्यासाठी नवा उद्योग सुरू केला असून सर्व सामान्य शेतकऱ्यांकडून अल्पशाः दरात भाजीपाला घेऊन तो दुप्पट दराने विकला जात आहे. या प्रकरणी पालिका अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता ते काम पोलीसांचे आहे असे उत्तर मिळाले आहे. तर यांची तक्रार पोलिसांकडे तक्रार केली असता ते पालिकेचे काम असल्याचे सांगत याकडे कानाडोळा केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या