नगर महापालिका निवडणूक : शिवसेनेला सर्वाधिक जागा

99

सामना प्रतिनिधी । नगर

नगरमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 24 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे 18, भाजपचे 14, काँग्रेसचे पाच आणि सात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. या निकालानंतर गुलाल उधळून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

nagar-sena-news

नगरमध्ये रविवारी 9 डिसेंबरला मतदान पार पडले होते. एकूण 67 टक्के मतदान झाले होते. भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत होती. सोमवारी जशीजशी मतमोजणी सुरू झाली तशीतशी चूरस वाढत होती. अखेर दुपारी चारच्या आसपास सर्व निकाल स्पष्ट झाले. यात शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे 2003 मध्ये अस्तित्वात आलेल्या नगर महापालिकेच्या आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. 2003 2008 आणि 2013 या तिन्ही निवडणुकांतून कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही.

प्रभागानुसार विजयी उमेदवारांची यादी –

प्रभाग 1 –
सागर बोरूडे -राष्ट्रवादी – 4641
मीना चव्हाण- राष्ट्रवादी – 4571
दीपाली बारस्कर-राष्ट्रवादी – 6224
संपत बारस्कर-राष्ट्रवादी – 5896

प्रभाग 2 –
विनित पाऊलबुदधे- राष्ट्रवादी 5236
रुपाली वारे- काँग्रेस 5837
संध्या पवार-काँग्रेस 6072
सुनील त्रंबके-राष्ट्रवादी 5021

प्रभाग 3 –
समद खान-राष्ट्रवादी -3467
रिझवाना शेख- काँग्रेस -2243
मिनाज खान-अपक्ष-4026
असिफ सुलतान-समाजवादी-2329

प्रभाग 4 –
ज्योति गाडे- राष्ट्रवादी 3751
शोभा बोरकर-राष्ट्रवादी 3875
योगिराज गाडे-शिवसेना 3715
स्वप्नील शिंदे-भाजप 2761

प्रभाग 5-
मनोज दुलम-भाजप 5039
सोनाबाई शिंदे -भाजप 4661
आशा कराळे -भाजप 4573
महेंद्र गंधे-भाजप 4801

प्रभाग 6 –
सारिका भुतकर – शिवसेना -3780
बाबा वाकळे – भाजप-5029
वंदना ताठे – भाजप-3502
रवींद्र बारस्कर – भाजप-3343

प्रभाग 7 –
रीता भाकरे- शिवसेना -4353
अशोक बडे- शिवसेना -4716
कमल सप्रे-शिवसेना –4295
कुमार वाकळे-राष्ट्रवादी -4822

प्रभाग 8 –
रोहिणी शेंडगे-शिवसेना-4662
पुष्पा बोरूडे -शिवसेना-6641
श्याम नळकांडे-शिवसेना-4379
सचिन शिंदे-4398

प्रभाग 9 –
शीला चव्हाण-काँग्रेस -3536
मालन ढोणे-भाजप-6124
श्रीपाद छिदम -अपक्ष -4532
सुप्रिया जाधव-काँग्रेस -6484

प्रभाग 10 –
अक्षय उनवणे-बसपा-3023
अश्विनी जाधव-बसपा-5807
अनिता पंजाबी -बसपा-3331
मुदस्सर शेख -बसपा-5784

प्रभाग 11 –
रूपाली जोसेफ पारगे -राष्ट्रवादी 4442
अविनाश घुले-राष्ट्रवादी 4946
परवीन कुरेशी-राष्ट्रवादी 5069
नज्जू पहेलवान-राष्ट्रवादी 4495

प्रभाग 12 –
बाळासाहेब बोराटे-शिवसेना 8254
सुरेखा कदम-शिवसेना 6128
मंगल लोखंडे-शिवसेना 4652
दत्ता कावरे-शिवसेना 5604

प्रभाग 13 –
गणेश कवडे-शिवसेना -5658
सोनाली चितळे-भाजप-5463
सुवर्णा गेनप्पा-शिवसेना -4266
सुभाष लोंढे-शिवसेना-6306

प्रभाग 14 –
प्रकाश भागानगरे-राष्ट्रवादी -4416
शीतल जगताप-राष्ट्रवादी -5100
गणेश भोसले-राष्ट्रवादी -6348
मीनी चोपडा-राष्ट्रवादी -4534

प्रभाग 15 –
परसराम गायकवाड-शिवसेना-3927
सुवर्णा जाधव-शिवसेना -4096
विद्या खैरे-शिवसेना -3120
अनिल शिंदे-शिवसेना -2880

प्रभाग 16 –
शांताबाई शिंदे-शिवसेना -4652
सुनीता कोतकर- शिवसेना -4558
विजय पटारे-शिवसेना -5421
अमोल येवले-शिवसेना -5082

प्रभाग 17 –
राहुल कांबळे -भाजप-3981
गौरी ननावरे-भाजप-4399
लता शेळके -भाजप -3873
मनोज कोतकर-भाजप-5341

आपली प्रतिक्रिया द्या