नगर पंचायत समितीचा कारभार चांगला करा, जिल्हाप्रुख शशिकांत गाडे यांच्या सूचना

479

नगर तालुका पंचायत समितीची परंपरा आदर्शवत आहे. तालुक्यातील आमदार नसला तरी तालुक्याला लाभलेले चारही आदार सहकार्य करणारे आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्राणात कामे आणून पंचायत सामितीचा लौकिक वाढवा, कोणत्याही प्रकारचे गालबोट लावू नये अशा सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नूतन पदाधिकार्‍यांसह सदस्यांना दिल्या.

नगर तालुका पंचायत सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर यांनी महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार घेतला. यावेळी परीक्षणार्थी अधिकारी आसिमा मित्तल, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय केदारे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकाटे, माजी सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार, संदीप गुंड, विश्‍वास जाधव, संपतराव म्हस्के, प्रकाश कुलट, दत्ता नारळे, प्रविण कोठुळे, जनार्धन माने आदी उपस्थित होते.

प्रा. गाडे म्हणाले की, नगर तालुका पंचायत समितीची परंपरा आदर्शवत आहे. तालुक्याला लाभलेल्या आदारांकडून मोठ्या प्रमाणात कामे आणून तालुक्याचा विकास होईल अशी कामे करावीत. विद्यमान आमदार हे सहकार्य करणारे आहेत. जिल्ह्यातील 14 सभापतींपैकी सर्वात मोठा निधी माजी सभापती रादास भोर यांनी आणला आहे. घोसपुरी, बुर्‍हाणनगर पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने चालविण्याचे का पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वजण मिळून करू. राज्यातही आपलेच सरकार असल्याने निधी मिळण्यास अडचणी येणार नसल्याचे ते म्हणाले.

पंचायत समिती सभापती हा तालुक्याचा मिनी आमदार असतो. पदाधिकार्‍यांनी निसंकोचपणे ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन काँग्रेसचे नेते बाळासाहेब हराळ यांनी केले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती सामन्यांची शिदोरी आहे. त्यामुळे अधिकारी-पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे कामे करावीत. पाणी, घरकुल, शौचालय आदी काामाना नूतन सभापती- उपसभापतींनी प्राधान्य द्यावे असे माजी सभापती रामदास भोर यांनी सांगितले. प्रकाश कुलट यांनी आभार मानले.

पंचायत समिती निधी तळागाळापर्यंत पोहोचवणार- सभापती कोकाटे
पंचायत समिती माजी सभापती संदेश कार्ले, रादास भोर यांनी तालुक्यात उत्कृष्टपणे कामे करुन पंचायत समितीचा लौकिक वाढविला आहे. कार्ले, भोर यांच्याप्राणेच चांगला कारभार करून पंचायत समितीचा निधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणार असल्याचे आश्‍वासन नूतन सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रविंद्र भापकर यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या