अयोध्या प्रकरणी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुर्नविचार याचिका दाखल करणार

528

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्या प्रकरणाच्या निकालाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुर्नविचार याचिका दाखल करणार आहे. रविवारी लखनऊमध्ये बोर्डाची तीन तास बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर बोर्डाने एका पत्रकार परिषदेत हा निर्णय सांगितला. तसेच कोर्टाने दिलेली पाच एकर मंजूर नसल्याचेही बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले.


पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारणीची बैथक अध्यक्ष हजरत मौलाना सैय्यद राबे हसनी नदवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अयोध्या निकालाच्या 10 निष्कर्षांवर चर्चा झाली. ज्यात सर्वोच्च न्यायालयाने तीन गोष्टी मान्य केल्या आहेत. पहिली म्हणजे 1857 ते 1949 दरम्यान बाबरी मशीदीचे तीन घुमट असलेले भवन आणि मशिदीतील अंतर्गत्भाग मुस्लिम सामाजाच्या ताब्यात होता. शेवटची नमाज 16 नोव्हेंबर 1949 रोजी पार पाडली आणि 22-23 डिसेंबर 1949 रोजी मशिदीत प्रभू रामाची मुर्ती ठेवण्यात आली तसेच मशीदीच्या मधला भाग हा जन्मस्थान म्हणून पुजा केली जात होती असे सिद्ध झालेले नाही.

अयोध्या प्रकरणी बोर्डाच्या बहुतांशी सदस्यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच पुर्नविचार याचिका दाखल करावी असे त्यांचे म्हणने होते. बाबरी मशिदीच्या ऐवजी कुठलीच जमीन घेऊ नये यावर बहुतांश लोकांचे एकमत झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या