वायुदल आपल्या ताफ्यातील सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली करणार आहे. 2000 दशकाच्या सुरुवातीला रशियातून सुखोई-30 विमाने खरेदी करण्यात आली होती. 20 वर्षांनंतर या फायटर जेट विमानांना अपग्रेड करण्याची गरज आहे, जेणेकरून सध्याच्या विमानांना ते कडवी टक्कर देऊ शकतील. सुखोई-30 विमानांना सरकार ‘सुपर सुखोई’ बनवणार आहे. हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेडला 84 सुखोई 30 एमकेआय विमानांना अपग्रेड करण्याची मंजुरी मिळाली आहे.
63 हजार कोटी रुपये खर्च
हिंदुस्थान वायुदलाकडे सध्या 259 सुखोई एसयू 30 एमकेआय लढाऊ विमाने आहेत. सुखोईंच्या अपग्रेडेशन प्रक्रियेवर 63 हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. या प्रक्रियेत नवीन रडार, मिशन कंट्रोल सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर कॅपेबिलिटी आणि ऍडवान्स वेपन सिस्टीम लावले जातील. अपग्रेडेशन प्रक्रियेमुळे सुखोई 30 एमकेआय फायटर विमानांचे आयुष्य वाढेल आणि पुढे 2055 सालापर्यंत ते धडाकेबाज काम करतील.