विमानात वाफाळलेला रोमान्स, एअरहोस्टसने रंगेहाथ पकडलं

47646
kissing-video

प्रेमाचा काही नेम नाही, ते कुठे, कधी, कुणावर होईल काहीच सांगता येत नाही. मात्र ते व्यक्त करण्यासाठी काही सामाजिक संकेत पाळण्याचं भान पाळता एका प्रेमी युगुलाने विमानातच एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर जे सुरू झालं त्यानं सारे प्रवासी ओशाळले.

मॉस्को येथून व्लादिवोस्तोक येथे जाणाऱ्या विमानातच एका युगुलाने सेक्स सुरू केला. हा प्रकार सुरू असताना एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड करण्यात आला आहे. एका एअरहोस्टेसने हा प्रकार पाहिला आणि त्याची तक्रार विमानाच्या कॅप्टनकडे करण्यात आली.

त्यानंतर त्या दोघांवर कारवाई करण्यात आली. विमानाचे लँडिंग करण्यात आल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे वय 43 वर्ष तर पुरुषाचे वय 41 असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. रोसीया एअरलाईन्समध्ये हा प्रकार सुरू होता, अशी माहिती स्थानिक वृत्तपत्र Komsomolskaya Pravda मधून देण्यात आली आहे. या दोघांची काही तासांपूर्वीच विमानतळावर ओळख झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, या प्रेमी युगुलाला पकडले तेव्हा ते नशेत होते. रशियाचा अंतरिम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 15 दिवासांपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. याला अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अरेस्ट असंही म्हणण्यात येतं.

या व्हिडीओमध्ये अश्लील चाळे कैद झाले असून एअरहोस्टेसचा संवाद ही ऐकू येत आहे. हा व्हिडीओ दोघांविरोधातील पुरावा म्हणून आवश्यक असल्याचा एअरहोस्टेसचा आवाज येत आहे. दरम्यान, या प्रवाशांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या