एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मधल्या सीटचं बुकिंग होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

887
supreme-court

हवाई वाहतुकीदरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर आपला निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील दहा दिवसांनंतर विमानातील मधल्या सीटचं बुकिंग रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

हवाई वाहतुकीसाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचं असल्याने उच्च न्यायालयाने एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय वाहतुकी दरम्यान मधल्या सीटचं बुकिंग न करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला केंद्र सरकार आणि एअर इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीत सॉलिसिटर जनरल यांनी परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना या आदेशामुळे कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे आधीच एक तिकीट आहे. पण, आता या आदेशामुळे अडचण निर्माण झाली आहे, असा युक्तिवाद एअर इंडियातर्फे करण्यात आला.

त्यावर सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचा मुद्दा असल्याकडे लक्ष वेधत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र, पुढील दहा दिवसासांठी जिथे तिकिटे जारी करण्यात आली असतील, तिथे बुकिंग सामान्य स्थितीप्रमाणे करण्यात यावं, असं म्हटलं आहे. पण, त्यानंतर मात्र मधली सीट बुकिंगसाठी देण्यात येण्यास प्रतिबंध घातला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या