Air India Plane Crash – ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो अपघाताचे रहस्य कसे उलगडेल?

गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर, फ्लाइट एआय-171 हे उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू झाले आहे आणि विमान अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लाइट रेकॉर्डर्स, म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच कारणे कळतील.

विमान 625 फूट उंचीवर असताना कोसळल्याने, आता विमानाच्या आतील सर्व इत्यंभूत माहिती ही केवळ ब्लॅक बाॅक्सच्या माध्यमातूनच समोर येणार आहे. ब्लॅक बाॅक्स सापडल्यानंतर, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) इंजिनची कार्यक्षमता, नियंत्रण पृष्ठभागाची स्थिती आणि सिस्टम इशाऱ्यांबद्दल अचूक डेटा हातात येईल. तसेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आपत्कालीन चेकलिस्ट, क्रू समन्वय किंवा यांत्रिक समस्यांवरील चर्चा ब्लॅक बाॅक्स सापडल्यानंतर समोर येणार आहे.

Breaking- एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
खरंतर, “ब्लॅक बॉक्स” हा चमकदार नारिंगी रंगाचा असतो. मुख्यतः आगीपासून बचाव व्हावा याकरता ब्लॅक क्रॅश-प्रतिरोधक उपकरण आहे. ब्लॅक बाॅक्स हा आगीपासून बचाव होईल असाच तयार केलेला असतो.

 प्रत्येक व्यावसायिक विमानात असे दोन रेकॉर्डर असतात. जे मजबूत आवरणांमध्ये ठेवलेले असतात जे स्फोट, आग, पाण्याचा दाब आणि उच्च-वेगाने होणाऱ्या अपघातांना तोंड देऊ शकतात.

ब्लॅक बाॅक्स फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उंची, वेग, इंजिन थ्रस्ट आणि फ्लाइट मार्ग डेटा यासारखे महत्त्वाचे तांत्रिक पॅरामीटर्स रेकॉर्ड करतो. क्रॅश झालेले बोईंग  787 सारखे आधुनिक विमान कॉकपिट कमांड इनपुटपासून ते एअर कंडिशनिंग सिस्टमपर्यंत हजारो पॅरामीटर्स रेकॉर्ड करू शकते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सर्व कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतो – पायलट संभाषणे, रेडिओ ट्रान्समिशन, चेतावणी अलार्म आणि यांत्रिक आवाज या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती ब्लॅक बाॅक्सच्या माध्यमातून मिळते.