टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द

टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर सोमवारी दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 160 प्रवाशांना घेऊन हे विमान कोलकाताला निघाले होते. एअरलाइन कंपनीने घटनेची पुष्टी केली आहे.

एअर इंडियाचे AI2403 हे विमान कोलकातासाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. मात्र टेकऑफ दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यानंतर अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी हे विमान थांबवण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.