हिंदुस्थानी वायू दलाकडून बालाकोट एअर स्ट्राईकचा व्हिडीओ प्रदर्शित

1829

हिंदुस्थानी वायूसेनेने बालाकोट एअर स्ट्राईकचा एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओत एअर स्ट्राईकची तयारी आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचीही छायाचित्रे आहेत. वायू सेना दिनानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत नवे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

बालाकोट एअर स्ट्राईक ही एक महत्त्वाची घटना असल्याचं भदौरिया यांनी यावेळी म्हटलं. गेल्या वर्षभरात वायूसेनेने काही महत्त्वाचे टप्पे गाठले. यात बालाकोटमधील एअरस्ट्राईकही अंतर्भूत आहे. वायू सेनेने अत्यंत यशस्वीपणे ही कारवाई केली आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला, असं भदौरिया यावेळी म्हणाले. भविष्यात जर पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला झाला तर सरकारच्या योजनेनुसार त्याचं चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा सज्जड दमही भदौरिया यांनी पाकिस्तानला भरला. आता वायू सेना राफेल विमाने आणि एस-400ची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतर एअरफोर्सची ताकद कित्येक पटींनी वाढणार आहे, असंही भदौरिया यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

आपली प्रतिक्रिया द्या