सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एअरटेलने भरले 10 हजार कोटी

464

सर्वोच्च न्यायालयाने एअरटेल आणि व्होडाफोनला समायोजित सकल महसूल भरण्यावरून सुनावले होते. आता एअरटेलने दूरसंचार विभागला 10 हजार कोटी रुपये महसूल भरला आहे. उरलेली रक्कमही लवकरच भरणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

एअरटेल कंपनीने एक पत्रक जारी केली आहे. त्यानुसार भारती एअरटेल, भारती हेक्साकॉम आणी टेलीनॉर कंपनीकडून 10 हजार कोटी रुपयांचा महसूल भरण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीपूर्वी उर्वरित रक्कमही भरली जाईल असे कंपनीने सांगितले आहे.

समायोजित सकल महसूल लवकरात लवकर भरावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आणि एअरटेलला दिले होते. त्यापैकी एअरटेलने हा महसूल भरला आहे. एअरटेलकडे एकूण 35 हजार 586 कोटींचा महसूल बाकी होता. आता एअरटेलने 10 हजार कोटी भरले असून उर्वरित रक्कम 17 मार्च पर्यंत भरणार असल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या