ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण

1335

अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त शनिवारी प्रसारित झालं होतं. आता अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन हिला आणि नात आराध्या हिला देखील कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. शनिवारी ऐश्वर्या आणि आराध्या यांची टेस्ट करण्यात आली होती. पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, पुन्हा केलेल्या चाचणीत या दोघीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. सुदैवाने अभिनेत्री जया बच्चन यांची टेस्ट मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या