सीए परीक्षेत राजस्थानचा अजय अगरवाल देशात अव्वल

226

दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीएच्या अंतिम परीक्षेचा (जुना व नवा अभ्यासक्रम) निकाल आज जाहीर केला.

राजस्थानच्या कोटपुतली येथील अजय अगरवाल याने या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला. अजयने 650 गुणांसह 81.25 टक्के मिळवले. हैदराबादची राजलक्ष्मी (633 गुण) आणि ठाण्याचा उमंग गुप्ता (588 गुण) हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले. मे-जूनमध्ये ही अंतिम परीक्षा झाली होती.

सीए फाऊंडेशन परीक्षेत (जुना अभ्यासक्रम) पुण्याचा रजत राठी, श्रीकाकुलमचा कालीवरापू साई श्रीकर आणि भोपाळची प्रियांशी साबू हे टॉपर ठरले. आयसीएआयने टॉपर्सची यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या