सोनू सूदनंतर ‘सिंघम’चा पुढाकार, 700 कुटुंबांना मदत करणार

लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेलेल्या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी अभिनेता सोनू सूद याने स्वखर्चाने बऱ्याच गाड्या सोडल्या. सोनू स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होता. सोनूनंतर आता बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने देखील पुढाकार घेतला आहे. अजय धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या 700 कुटुंबांना मदत करणार आहे.

अजय देवगणने याबाबत ट्विट केले आहे. ‘धारावी हे कोरोनाचे केंद्र बनले आहे. बीएमसीचे कर्मचारी दिवसरात्र काम करून तेथील लोकांना मदत करत आहेत. बऱ्याच एनजीओ देखील लोकांना रेशन व हायजिन कीट पोहचवत आहेत. आम्ही देखील 700 कुटुंबांची मदत करत आहोत. मी तुम्हाला आवाहन करतो की आपणही या मदतकार्यासाठी दान करावे’, असे ट्विट अजयने केले आहे. याआधी देखील अजय देवगणने 1 कोटी रुपये पीएम फंडाला दान केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या