
कृषी विद्यापीठातल्या प्रवेशापासून जिल्हाधिकारी कार्यालयात अडकलेली कामे आणि कामचुकार कंत्राटदार अशी असंख्य गार्हाणी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज सर्वसामान्यांनी रांगा लावला होत्या.
बॅलाँर्ड पीअर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात दररोज जनता दरबार आयोजित करण्याच्या सुचना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत दररोज सकाळी व संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कामाची पध्दत अनेकांना माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागापासून मुंबई आणि नवी मुंबईतून लोक आले होते.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेचे प्रश्न, तक्रारी ऐकून त्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे निर्देश दिले.@NCPspeaks @MumbaiNCP pic.twitter.com/7y8hyOrXDa
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 2, 2020
कोरोनामुळे सोशल डिस्टिंगिंगचे पालन करीत अजित पवारांनी तक्रारी ऐकण्यास सुरवात केली. ग्रामीण भागातील एक मुलगा व त्याचे वडिल कृषी विद्यापीठात उपमुख्यमंत्र्यांच्या वशिल्याने प्रवेश मिळवण्यासाठी आले होते. मुलाला फकत 58 टक्के होते. पण कृषी विद्यापीठात काहीही करून प्रवेश मिळकून द्या असा वडिलांनी आग्रहच धरला. तेव्हा अहो, कोणत्याही कृषी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी 80- 85 टक्के लागतात. आमच्या बारामतीमधल्या कृषी विद्यापीठातही 58 टक्क्यांना प्रवेश मिळत नाही अशा शब्दात अजित पवार यांनी बाप-लेकाची समजूत काढली. संभाजीनगरहून आलेल्या एका महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयात काम अडकून पडले होते. अजित पवार यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लावून त्या महिलेचे काम मार्गी लावून दिले. नवी मुंबईतील इमारत बांधकामाचा ठेकेदार अतिशय संथगंतीने काम करीत होते तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी थेट नवी मुंबईच्या पालिका आयक्तांना फोन लावून काम मार्गी लावून दिले. उपमुख्यमंत्र्यांनी दोन तासात असंख्य तक्रारी ऐकून घेतल्या आणि अनेक कामे मार्गी लावून दिली .























































