…तर बायको हाकलून देईल!

13263

राजकारणातला दिलखुलास माणूस म्हणजे अजित पवार. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. पूर्वीच्या मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थाने रिकामी होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच भेटायला येणाऱया कार्यकर्त्यांना बसवायला आता फक्त आपली बेडरूमच शिल्लक राहिली असून तसे केल्यास बायको घरातून हाकलून देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला होता. त्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘देवगिरी बंगला अद्याप मिळालेला नाही. शंभर दिवस झाले तरी बाबा काय करतोय कुणास ठाऊक. बारामतीकर अनेकदा कामानिमित्त मुंबईत येतात. त्यांना पाहून मी नाराज होतो. मुंबईतील घर आधीच छोटे आहे. हॉलमध्ये जागा नसेल तर डायनिंग रूममध्ये आणि तिथेही गर्दी झाली की मुलगा जयच्या बेडरूममध्ये जावे लागते.’

आपली प्रतिक्रिया द्या