
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून आंदेकर कुटुंबीय, कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे, गुंड बापू तथा कुमार नायर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे. यामुळे अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांनी मात्र या जागा आपण निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाला दिल्या आहेत. त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा संपूर्ण अधिकार त्यांचा आहे. असे सांगत या प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे पोलीस प्रशासनाला गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री, दुसरीकडे मात्र गुन्हेगारी टोळय़ांशी संबंधित व्यक्तींना राजकीय प्रतिष्ठा देत असल्याची टीका सर्व स्तरातून झाली.आज कोरेगाव भीमा येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुकीत आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटासोबत युती झाली आहे. युतीच्या जागावाटपानुसार आम्ही काही जागा मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. ज्या जागा मित्रपक्षाला दिल्या जातात, तिथे उमेदवार निवडण्याचा पूर्ण अधिकार संबंधित पक्षाचा असतो. तिथे आमचा हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले.
अजितदादांच्या गुंड उमेदवारांमुळे पुण्यात गुन्हेगारी वाढणार; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची टिका





























































