
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अजूनही प्रशासकीय कागदोपत्री अडचणींमुळे संबंधित पोलीस ठाणे स्थलांतरित झाले नाही. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांना स्टेजवरच खडे बोल सुनावले. मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांनी सांगूनही बंडगार्डन पोलीस ठाणे दुसरीकडे हटवले जात नाही, यावरून अजित पवार चहल यांच्यावर संतापले व त्यांनी भर कार्यक्रमात चहल यांची खरडपट्टी काढली. पुण्यातील विविध प्रकल्पांच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी चहल यांना सुनावले.
”आम्ही सर्व या सरकारमध्ये महत्त्वाच्या कामाचा मी ताबडतोब निर्णय घेतो आणि मार्ग काढतो. आमचं कलेक्टर कार्यालयाजवळ बंड गार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा सांगितलं अजून ते काम झालेलं नाही. मी देवेंद्रजींना सांगितलं त्यांनी ते रश्मी शुक्लांना सांगितलं. मी रश्मी शुक्लांना विचारलं त्यांनी सांगितलं की माझ्याकडून फाईल वर गेली आहे. चहल मला परत सांगायला लावू नका, औंधच्या त्या संदर्भात आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय वाहतुकीसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत. चाकण ला सकाळी गेलो होतो. आम्ही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी सर्व करतोय अतिक्रमण काढतोय. लोक बोलतात तुम्ही आमचं काढता आणि औंध च्या पुढे पोलिसांची दोन कार्यालये आहेत. कितीतरी दिवस ते काढायचे राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, शुक्कांकडून प्रस्ताव पुढे गेलाय. जर आपल्या कामातून वेळ काढा आणि त्याला मान्यता द्या. म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी दूर व्हायला मदत होईल. आम्हीजी कामं सांगतो ती सार्वजनिक सांगतो. तिथे नियमाने वागलं पाहिजे.तसंच आम्ही वागतो, असे अजित पवार म्हणाले”, असे