
अनधिकृत भोंग्यांच्या मुद्दय़ावरून मशिदींमध्ये जाऊन चमकोगिरी करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दांत तंबी दिली. मशिदीत जाऊ नका, दंगली भडकतील, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल, अशा शब्दांत अजितदादांनी सोमय्यांना बजावले.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दय़ावरून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी सपा आमदार अबू आझमी, काँग्रेस नेते नसीम खान, एमआयएमचे वारीस पठाण यांनी सोमय्या हे मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी जबरदस्ती करत असून पोलिसांवर दबा टाकत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती त्या बैठकीला हजर होते.
मुंबईत आतापर्यंत 1500 भोंगे उतरवले
मुंबईत आवाजाची मर्यादा ओलांडणारे मशिदींवरील दीड हजार भोंगे आतापर्यंत उतरवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
n पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेल्या 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादेचे पालन होऊच शकत नाही. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाजदेखील 4
6 डेसिबलपेक्षा जास्त आहे, असे प्रात्यक्षिकासह या बैठकीत सिद्ध करून दाखवले. त्यावर अजित पवार यांनी नियमांची पायमल्ली होत असेल तिथे कारवाई करा, फक्त चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश दिले.