अजमेर येथील जवळपास 100 विद्यार्थिनींना 32 वर्षांपूर्वी ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या 6 जणांना आज जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
पोलिसांच्या अक्षम्य ढिसाळपणामुळे तारीख पे तारीख पडत हा खटला 32 वर्षे रेंगाळत सुरू होता. अजमेरसह संपूर्ण देशालाच मोठा हादरा देणाऱ्या या सर्वात मोठ्या सेक्स स्पँडलमधील 6 दोषींना प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.